काही मनातले… काही आठवणीतले…
- सुशांत रा. कणसे.
बिस्त्या..!!
भाऊंच्या घरची लगीन घाई सरली होती. घरात पोराच्या लग्नाचा पहिलाच बार असल्यानं झाडून सारी पावणं रावळं नि भावकी जमली होती. सात-आठ पोरांच्यातलं पहिलंच लगीन असल्यानं वरमाय वरबापासह साऱ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. लग्नाच्या लगीन घाईत पायाला पाय नसताना डोक्यात अनेक विचारांची गर्दी असताना वरबाप असणाऱ्या भाऊंच्या डोक्यात मात्र दुसऱ्याच काळजीने घर केलं होतं. लग्नाइतकंच तिकडंसुद्धा मन घिरक्या घेत होतं. त्याच काय झालं असेल ? त्यो असंल का ? एवढं थांबल्यासारखं आजचा दिस तरी त्यानं थांबावं. देवाने त्याचं गाऱ्हाण ऐकलं होतं. लगीन पार पडलं. तो मात्र भाऊंची नि घरच्यांची वाट डोळ्यात प्राणआणून पाहत थांबला होता.
(काल्पनिक चित्र) |
महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वजातींना सामावून घेऊन हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. त्या सर्व शूरवीरांचे वर्णन, महाराष्ट्र भूमीचे कौतुक आपल्या लेखणीतून, शब्दांतून अनेक कवी, लेखक, इतिहासकारांनी, प्रतिभावंतांनी करून ठेवले आहे. त्या सर्व प्रतिभावंतांना स्मरून त्यांच्या शब्दसुमनांतून महाराष्ट्र वर्णन पाहूयात...
वपु एक विचार..!!
रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हा "वपु एक विचार " संग्रह सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणी ज्यांना माहीती नाही अशांसाठी सुद्धा. खात्री आहे तुम्हा वाचकांना हे वाचून नक्कीच आनंद होईल !
-------------------------------------------------
-------------------------------------------------
![]() |
![]() |

सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात. समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या. आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची. स्वतःकडेच नीट पाहायचं. 'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे.
~ वपु काळे | मायाबाजार
-------------------------------------------------------------------
"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."
~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."
~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण
जन्म- १२ मार्च १९१३
मृत्यु- २५ नोव्हेंबर १९८४
मा. यशवंतराव चव्हाण हा मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत होता, माझा सारख्यांचा आजही तो आदर्श आहे.
जाणीव आपुलकीची..
२४-१-२०१७
शाळेचे दिवस अन त्या आठवणी कुणाला न आवडणाऱ्या असतात, सगळ्यांना त्या हव्या हव्याश्या असतात. पण मोठं झाल्यावर आम्ही ते लहानपणीच मुक्तपणे वागणं बोलणं अन् बागडणं विसरलेलो असतो. मोठं झालेलो असतो. लहानपणी सुखी, आनंदी असतो. पण आता मोठं झाल्याने सुख आनंद शोधण्यासाठी आमची मनं विखुरलेली असतात. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा सुख, समाधान, आनंद असतो हे आम्ही विसरलेलो असतो.

पानिपतावरील संक्रांत..
संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि पानिपतच्या रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारात रांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानिपतावर रक्ताचे सडे. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजवत होत. तर महाराष्ट्रातल्या लेकीसूनांचं सौभाग्य मराठ्यांच्या सौभाग्यासाठी पानिपतावर झुंझत होतं.
वपुर्झा..
रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हि पोस्ट सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणि ज्यांना माहिती नाहीत अशांसाठी सुद्धा. मला खात्री आहे, वपुंचे विचार वाचताना तुम्हांस नक्कीच आनंद होईल...!
===============================
मातृदिन...
मदर्स डे अर्थात मातृदिन...
अमेरिकेमध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जात आहे.
खर तर आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन ? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच.

Subscribe to:
Posts (Atom)