To be or not to be that is the question…
To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा
धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो जुन
जागेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेक-
यांच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तु हीआम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या हाडांचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?
कोणाच्या ? कोणाच्या???

कुणी घर देता का घर ?
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.

रागावयचे नाही…
रागावयचे नाही…
रागावून काय फायदा आहे आणि रडणारसुद्धा नाही.
माझ्या डोळ्यात आसवं जमा व्हायला लागले ना मग खिळे मारून खाचा करून टाकीन,
पण या आगीसमोर रडणार नाही.
रागावयचे नाही…
रागावून काय फायदा आहे आणि रडणारसुद्धा नाही.
माझ्या डोळ्यात आसवं जमा व्हायला लागले ना मग खिळे मारून खाचा करून टाकीन,
पण या आगीसमोर रडणार नाही.
नटसम्राट मधील अप्पा आणि कावेरीचा खुप प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद....
अप्पा — कावेरी, गेल्या पन्नाससाठ वर्षात एक
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती .
कावेरी — कोणती ती?
अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
कावेरी — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ?
अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं.
कावेरी — एक विचारु का ? रागवायचं नाही हं.
अप्पा — विचार.
कावेरी — मला सवती किती होत्या!
अप्पा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार? पण तुला एक सांगतो,
कावेरी, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या.
कावेरी — मी मैत्रिण नव्हते ?
अप्पा — तू बायको होतीस.
कावेरी — बायको मैत्रिण असू शकत नाही ?
अप्पा — असू शकते, असतेही; पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते.
दिवाणखाना कमी असतो,
पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते,
पण पृथ्वी अधिक असते.
थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी,
नवरा नावाच्या गलबतासाठी.
गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी
करायला बाहेर पडतं.
हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे,
प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं,
दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी
मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक
करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी.
जगणं असं असावं की पावला-पावलांवर
मरणाशी मुलाखत व्हावी.
परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत
सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे
घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील
हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या
गालिच्यावर विश्रांत होतं.
गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो,
पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...
अशी आहे बंदराची महती....
म्हणजे बायकोची!!!!
Ya aagi samor radnaar nahi he chuke sir ya aalae samor ase aahe
ReplyDeleteChalte ho...thode samjun ghyayche aapanch ,rahile asel chekun.
Deleteआज खूप महिन्यांनी हे सर्व डायलॉग जोरात वाचले...क्षणभर भूतकाळात गेलो मी..वाह क्या बात है...वाहवा करायला शब्दांचा साथासाठा अपूर्ण पडतोय् आज...वाह 🙏🙏👌🏻
ReplyDeleteGreat writing
ReplyDelete