मोकळ हसण आयुष्य आहे की मोकळ वागण आयुष्य आहे
सुख-दुखं यांच्या फेऱ्यात अडकण आयुष्य आहे
की बंधनमुक्त रहाण आयुष्य आहे
आयुष्य म्हणजे नेमकं आहे तरी काय?
सुख-दुखाच्या मातीत रोवलेलं पाय आयुष्य आहे
आयुष्य आहे म्हणून आहे सुख-दुख
की सुख-दुखं आहे म्हणून आहे आयुष्य
या सगळ्यांचा विचार करून होणार आहे काही सार्थ
की आपण याचा विचार करून आहे व्यर्थ?
आयुष्य म्हणजे आहे, न सुटणार कोडं
ते कोडं सोडवता सोडवता उरत आयुष्य थोडं………
-Sushant_Kanase
आयुष्य…
पडदया मागील बाबा ...
आईचं गुणगाण खुप केले
पण बिचा-या बापाने काय केले?
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी
आपण फक्त गातो आईचीच गोडवी
आईकडे असतील अश्रुंचे पाट,
तर बाप म्हणजे संयमाचा घाट.
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोय ही बापच पाही....
देवकी - यशोदेचं प्रेम मनात साठवा
टोपलीतुन बाळास नेणारा वासुदेवही आठवा
रामा साठी कौशल्येची झाली असेल कसरत
पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ
काटकसर करुन मुलास देतो पौकेटमनी
आपण मात्र वापरे शर्ट-पॅन्ट जुनी
मुलीला हवे ब्युटीपर्लर, नवी साडी
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी
वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न
मुलाच्या नोकरीसाठी जिना चढुन लागते धाप
आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप
जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा
त्यांनी समजुन घ्यावं, हीच माफक इच्छा..!!
-सुशांत
प्रेम
प्रेम
================
प्रेम असे कुणालाही
सहज गवसत नाही
ते नशिबात नसेल तर
कधीच मिळत नाही
प्रेम म्हणजे काय
कुणालाही सांगता येत नाही
त्याचा अनुभव आल्याशिवाय
प्रेम कळत नाही
कधी भेटते एका भेटीत
कधी चाहूलही लागत नाही
कुणीतरी आवडत असतं
पण मनाला ते समजत नाही
एक क्षण येतो असा
हे प्रेमच आहे कळून जातं
जेव्हा जीव प्रेमाशिवाय
जगू शकत नाही
===================sushant kanase
'' आई ''
''आई'' म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
....................... गीत - यशवंत
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
....................... गीत - यशवंत
Subscribe to:
Posts (Atom)