दुःख हे माझे..

दुः ख  हे माझे ऐकले,
मी एकट्याने भोगले .
गत काळाच्या आठवणी ,
नयन माझे आश्रुने माखले .


वपु एक विचार..!!


रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हा "वपु एक विचार " संग्रह सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणी ज्यांना माहीती नाही अशांसाठी सुद्धा. खात्री आहे तुम्हा वाचकांना हे वाचून नक्कीच आनंद होईल !

-------------------------------------------------
वपुं काळेंची काही निवडक पुस्तके..

 

सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात. समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या. आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची. स्वतःकडेच नीट पाहायचं. 'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे.
~ वपु काळे | मायाबाजार
-------------------------------------------------------------------
"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्‍यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण


जन्म- १२ मार्च १९१३
मृत्यु- २५ नोव्हेंबर १९८४

                    मा. यशवंतराव चव्हाण हा मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत होता, माझा सारख्यांचा आजही तो आदर्श आहे.

मनात खुप काही असतं,
पण शांत बसणंच बंर असतं,
आपलं दुःख लपवण्यातंच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालतं,
लोकांमध्ये मात्र हसायलाच लागतं..

जाणीव आपुलकीची..

२४-१-२०१७
           
                    शाळेचे दिवस अन त्या आठवणी कुणाला न आवडणाऱ्या असतात, सगळ्यांना त्या हव्या हव्याश्या असतात. पण मोठं झाल्यावर आम्ही ते लहानपणीच मुक्तपणे वागणं बोलणं अन् बागडणं विसरलेलो असतो. मोठं झालेलो असतो. लहानपणी सुखी, आनंदी असतो. पण आता मोठं झाल्याने सुख आनंद शोधण्यासाठी आमची मनं विखुरलेली असतात. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा सुख, समाधान, आनंद असतो हे आम्ही विसरलेलो असतो.
                 
                                 

पानिपतावरील संक्रांत..

संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि पानिपतच्या रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारात रांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानिपतावर रक्ताचे सडे. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजवत होत. तर महाराष्ट्रातल्या लेकीसूनांचं सौभाग्य मराठ्यांच्या सौभाग्यासाठी पानिपतावर झुंझत होतं.
                         

वपुर्झा..



रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हि पोस्ट सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणि ज्यांना माहिती नाहीत अशांसाठी सुद्धा. मला खात्री आहे, वपुंचे विचार वाचताना तुम्हांस नक्कीच आनंद होईल...!
===============================

गणेश भद्रोत्सव अंगापूर, सातारा

               सर्वांच लक्ष लागून राहिलेला गणेश उत्सवाचा सण जवळच येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो.  वेगळेपण जपणारा असा असणारा गणेशउत्सव म्हणजे अंगापूरचा "भद्रोत्सव"  महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सर्वपरिचत आहे.

मातृदिन...

मदर्स डे अर्थात मातृदिन...
                 अमेरिकेमध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जात आहे.
                  खर तर आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन ? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच.

शिवजयंती....

१९ फेब्रुवारी ''शिवजयंती''....
   
              खर तर शिवजयंतीचा तिथी आणि तारखेच्या वाद बाजूला ठेवून,  प्रश्न हा आहे कि शिवजयंती कोणतीही असो त्यादिवशी आपण नक्की काय करतो किंवा काय करायचं ठरवतो ?
              तर facebook आणि whats app वरून भरभरून शुभेच्छा देतो. काही यापुढे जाऊन प्लेक्स लावतात, मिरवणुका काढतात, पूजा करतात , DJ लावतात. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या विचारांचा आदर कोण ठेवतो आणि त्यानुसार वागण्याचा कोण प्रयत्न करतो ?

कुणीच नसतं.....

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण,
तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण,
तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडला सारा तर आकडेही पडतील कमी,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना ?
लाख झाला असेल मनाचा दगड,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना ?
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य,
तरीही जीव जडतातच ना ??

धर्मवीर…

1 फेब्रुवारी…
               1 फेब्रुवारी 1689 मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा दिवस. मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज मुघलांनी संगमेश्वरात कैद केले तो दिवस...
                1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यावर थांबले असताना. औरंगजेबाला संभाजी राजे संगमेश्वरला असल्याची खबर लागली. खबर लागताच औरंगजेबाने स्वतःचा मुलगा व मुकर्रब खान यांची रवानगी संभाजीराजांना कैद
करण्यासाठी केली. अचानक हल्ला झाला. सरदेसाई यांच्या वाडयातून संभाजी राजे बाहेर पडले. सोबत होते सरसेनापती मालोजी घोरपडे. पण मुकर्रब खानशी लढता-लढता मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. फितुरीने झालेला दगा
यामुळे मुकर्रब खानाची सरसी झाली. छत्रपती संभाजी महाराज चपळाईने घोडयावर स्वार झाले. वेगाने घोडा सोडला. तेवढयात कवि कलेशाचा आवाज आला.