आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण


जन्म- १२ मार्च १९१३
मृत्यु- २५ नोव्हेंबर १९८४

                    मा. यशवंतराव चव्हाण हा मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत होता, माझा सारख्यांचा आजही तो आदर्श आहे.

मनात खुप काही असतं,
पण शांत बसणंच बंर असतं,
आपलं दुःख लपवण्यातंच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालतं,
लोकांमध्ये मात्र हसायलाच लागतं..

जाणीव आपुलकीची..

२४-१-२०१७
           
                    शाळेचे दिवस अन त्या आठवणी कुणाला न आवडणाऱ्या असतात, सगळ्यांना त्या हव्या हव्याश्या असतात. पण मोठं झाल्यावर आम्ही ते लहानपणीच मुक्तपणे वागणं बोलणं अन् बागडणं विसरलेलो असतो. मोठं झालेलो असतो. लहानपणी सुखी, आनंदी असतो. पण आता मोठं झाल्याने सुख आनंद शोधण्यासाठी आमची मनं विखुरलेली असतात. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा सुख, समाधान, आनंद असतो हे आम्ही विसरलेलो असतो.
                 
                                 

पानिपतावरील संक्रांत..

संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि पानिपतच्या रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारात रांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानिपतावर रक्ताचे सडे. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजवत होत. तर महाराष्ट्रातल्या लेकीसूनांचं सौभाग्य मराठ्यांच्या सौभाग्यासाठी पानिपतावर झुंझत होतं.
                         

वपुर्झा..



रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हि पोस्ट सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणि ज्यांना माहिती नाहीत अशांसाठी सुद्धा. मला खात्री आहे, वपुंचे विचार वाचताना तुम्हांस नक्कीच आनंद होईल...!
===============================

गणेश भद्रोत्सव अंगापूर, सातारा

               सर्वांच लक्ष लागून राहिलेला गणेश उत्सवाचा सण जवळच येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो.  वेगळेपण जपणारा असा असणारा गणेशउत्सव म्हणजे अंगापूरचा "भद्रोत्सव"  महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सर्वपरिचत आहे.

मातृदिन...

मदर्स डे अर्थात मातृदिन...
                 अमेरिकेमध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जात आहे.
                  खर तर आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन ? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच.

शिवजयंती....

१९ फेब्रुवारी ''शिवजयंती''....
   
              खर तर शिवजयंतीचा तिथी आणि तारखेच्या वाद बाजूला ठेवून,  प्रश्न हा आहे कि शिवजयंती कोणतीही असो त्यादिवशी आपण नक्की काय करतो किंवा काय करायचं ठरवतो ?
              तर facebook आणि whats app वरून भरभरून शुभेच्छा देतो. काही यापुढे जाऊन प्लेक्स लावतात, मिरवणुका काढतात, पूजा करतात , DJ लावतात. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या विचारांचा आदर कोण ठेवतो आणि त्यानुसार वागण्याचा कोण प्रयत्न करतो ?

कुणीच नसतं.....

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण,
तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण,
तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडला सारा तर आकडेही पडतील कमी,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना ?
लाख झाला असेल मनाचा दगड,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना ?
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य,
तरीही जीव जडतातच ना ??

धर्मवीर…

1 फेब्रुवारी…
               1 फेब्रुवारी 1689 मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा दिवस. मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज मुघलांनी संगमेश्वरात कैद केले तो दिवस...
                1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यावर थांबले असताना. औरंगजेबाला संभाजी राजे संगमेश्वरला असल्याची खबर लागली. खबर लागताच औरंगजेबाने स्वतःचा मुलगा व मुकर्रब खान यांची रवानगी संभाजीराजांना कैद
करण्यासाठी केली. अचानक हल्ला झाला. सरदेसाई यांच्या वाडयातून संभाजी राजे बाहेर पडले. सोबत होते सरसेनापती मालोजी घोरपडे. पण मुकर्रब खानशी लढता-लढता मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. फितुरीने झालेला दगा
यामुळे मुकर्रब खानाची सरसी झाली. छत्रपती संभाजी महाराज चपळाईने घोडयावर स्वार झाले. वेगाने घोडा सोडला. तेवढयात कवि कलेशाचा आवाज आला.

पुरोगामी महाराष्ट्र…

जे लोक इतक्या वर्षांपासून हिंदूंना देव दाखवून बक्षीस घेण्याचे आव्हान देत होते. तेच आज देवाच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी "लढा" देत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे शनी मंदिरातील चौथऱ्यावर गेल्या ३-४ वर्षांपासून पुरुषांना सुध्दा बंदी आहे. तेल एका डब्यात जमा करून तो डबा तेथील पुजारीच शनी महाराजांवर अर्पण करतात.
महिलांना पहिल्यापासूनच तेथे प्रवेशास बंदी आहे. पण, आता तर कोणालाच प्रेवश नाही.
चला मान्य केले कि, नास्तिकांना कोणता तरी फार मोठा बांबू लागला असणार. त्याशिवाय हे  आस्तिक होऊन देवाची पूजा करायला निघाले नसणार.
पण, कोणत्या देवाची पूजा???

"प्रजा"सत्ताक…

"प्रजा"सत्ताक…
२६ जानेवारी १९५०
            रोजी भारत प्रजासत्ताक झाला म्हणजेच ,
या दिवशी भारतीय सत्ता राजाकडून प्रजेकडे आली. भारत लोकशाहीप्रधान देश झाला. या आधी देशाचे राज्यकर्ते या देशाचे राजे होते व या दिवसा पासून ते या देशाचे सेवक झाले. अन् खरया अर्थाने भारत प्रजेची सत्ता असणारा देश बनला.…
  
                पण आज खरच भारत प्रजासत्ताक आहे?                  
जिथे आज भ्रष्ट नेत्यांचे घोटाळे उघड होऊन सुद्धा ते पुन्हा निवडून येतात,
मेरीट लिस्ट मध्ये येऊन सुद्धा जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही,
मेहनती तरुणांना वशिला नाही म्हणून नोकरी मिळत नाही,
सरकारी अनुदान मान्य होते पण ते शेतकरयांपर्यंत पोहचत नाही आणि म्हणून शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी आत्महत्येचा सोपा मार्ग निवडतात,
जिथे एखादा भ्रष्ट नेता जेलमधून बाहेर आल्यावर जल्लोष साजरा केला जातो अन तो भ्रष्ट असूनही कारवायी होत नाही .
देशद्रोह्यांना जेल होत नाही झाली तरी कोटींच्या सुख सुविधा पुरविल्या जातात.
सामान्य जनतेला न्याय सुरक्षा भेटत नाही, अन गुंडगिरी,अवैध धंदे करनारे जिथ सुखी चैन करतात .
जिथ प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य दिनी अभिमानाने छातीवर तिरंगा मिरवणारे आनंदी अन त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांचे कुटुंब मदतीसाठी उपेक्षित असत.
कसा तो आमचा प्रजासत्ताक अन् स्वातंत्र्य देश ??
           सामान्यांचा कांद्याने वांदा होतोय, पेट्रोलचे दर काही स्वस्त होत नाहीत. गुंडांचा बाजार होतोय अबलांचे जगण मुश्कील होत चाललय. बलात्कार वाढतायत, शेतकरी मरतायत, कलेक्टर जळतायत. टि.व्ही.वर नुस्ती चर्चा करतायत. शिवाजी, संभाजी, आंबेडकर, सावरकर नावे आता पक्षीय प्रायव्हेट प्राँपर्टी होत चाललिय.

जगण्यापेक्षा इथ झालय मरणच स्वस्त,
कुंपणच करतय आता शेत सारं फस्त.
तरीही आम्ही अभिमानाने फक्त शुभेच्छाच देतोय. अन्यायाविरुद्ध शांत बसण्याएवढे नाकर्ते आम्ही का झालोय ??
            
                              -सुशांत रा. कणसे