जीवन

                जीवन हे मोजकच असतं ,
                ते रडत कधी जगायच नसतं .

सुख दुःखाने आयुष्य घडत असतं ,
आपल्या दुःखाने कधी रडायच नसतं .

               संकटांना तोंड दयायच असतं ,
               पाठ फिरवून कधी घाबरायच नसतं .

कधी काही हरवतं तर कधी काही सापडतं ,
पण हरवल्याच दुःख कधी बाळगायच नसतं .
      
             दुसरयासाठी आपणही थोड सुख विसरायच असतं ,
             कारण आपल्याला हवं ते सगळं आपल्याला मिळत नसतं .

जीवन हे एकदाच जगायचं असतं ,
मरणानंतरही आपलं नाव इतरांना विसरु दयायच नसतं .

            आपल जीवन आपणच घडवायच असतं ,
            फुलासंगे फुलायचं की मातीसंगे मिसळायचं ते आपणच ठरवायच असतं .
                          - Sushant_R._Kanase

सांगा कसं जगायचं …??

                सांगा कसं जगायचं ?
       कण्हत कण्हत की गाणं म्हणत
                   तुम्हीच ठरवा..!

           डोळे भरून तुमची आठवण
             कोणीतरी काढतंच ना ?
                ऊन ऊन दोन घास
             तुमच्यासाठी वाढतंच ना ?
      शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
                      तुम्हीच ठरवा..!

              काळ्याकुट्ट काळोखात
             जेंव्हा काही दिसत नसतं
               तुमच्यासाठी कोणीतरी
              दिवा घेऊन ऊभं असतं
     काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
                      तुम्हीच ठरवा..!

           पायात काटे रुतून बसतात
                हे अगदी खरं असतं,
             आणि फुलं फुलून येतात
                  हे काय खरं नसतं ?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
                      तुम्हीच ठरवा..!

                पेला अर्धा सरला आहे
                असं सुद्धा म्हणता येतं
                 पेला अर्धा भरला आहे
                असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
                     तुम्हीच ठरवा..!

                 सांगा कसं जगायचं ?
          कण्हत कण्हत की गाणं म्हणत
                     तुम्हीच ठरवा..!
                          *** ***
            शब्द: मंगेश पाडगांवकर

आयुष्य…!!

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!

शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!

होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!

नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं

             - मंगेश पाडगावकर.

चारोळ्या

चमकणाऱ्या काजव्यांना
रात्रीचा अंधार घालवता येत नाही,
आणि त्या रात्रीला देखील
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही.

हात तुझा हाती होता..

हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..

सुखी आयुष्य…

आपण नाटक पहायला गेलो तर पुढली सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची.
तुमच जगातल स्थान असच सापेक्ष असत !
ते अविचल कधीच नसत …!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो !
हा अटळ विरोधाभास आहे…!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात !

आठवणी मैत्रीच्या…

शाळा.. आणि पावसाळा..

जगा आनंदाने…

"एक छिद्र उरलेलं"

महाभारतातील ही गोष्ट

एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला.

काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला.

परंतु, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता.

त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.

तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,

'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'

तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.

या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते.

तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,

'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण, एक विचारू? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?'

धर्मराजाला स्वतःची चूक कळली.

त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.

गोष्ट इथं संपली....

पण, भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी, अस्वस्थ करणारा आहे.

आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.

'तो काल मला भेटला होता, आज तो नाहीये',

'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीये.'

असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.

हा क्षण माझा आहे.

पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की, संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते ते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं!

जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात.
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.

जे कलावंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.

पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय?

शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण?

कुठल्या रूपात मागे उरतो आपण?

माझ्या घरात आज मी आहे.

उद्या मी नसेन.

माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल.

दहा दिवसांनी तो दिवा विझेल.

मग, त्या जागी माझा एक फोटो असेल.

लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो.

काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.

काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल...

आणि मग त्यानंतर पिढ्यान् पिढ्या, माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल !

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात'  करायचं का?...                                                    
इतिहास सांगतो काल सुखी होतो.

भविष्य सांगतं उद्या सुखी असशील.

पण...

तुमचे मन आणि विचार चांगले असेल, तर रोजच सुख आहे... नाही का ?

तर, मग,
जगा आनंदाने !!!

स्वप्न माझं…

स्वप्न माझं आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,
एकाच दिशेन चालण्याचं…

स्वप्न माझं आहे,
तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,
एकदा मिठीत घेण्याचं…

स्वप्न माझं आहे,
तुझ्या सोबत राहण्याचं,
छोठसं घरट बांधून,
त्यात दोघांनीच राहण्याचं…

स्वप्न  माझ आहे,
मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,
ते तू रंगवण्याचं ...

स्वप्न माझं आहे ,
तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून,
ते पूर्ण करण्याचं…


भेटत....
ती पण नाही,
भेटत...
मी पण नाही....

निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला
पटत नाही.

फसवत
ती पण नाही,
फसवत
मी पण नाही....

तिला रुसण्याचे दु:ख
आहे,
मला एकटेपणाची
भीती आहे....

समजत...
ती पण नाही,
रागवत.....
मी पण नाही......

कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी

बघत...
ती पण नाही,
थांबत...
मी पण नाही....

जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....

ऐकत..
ती पण नाही,
सांगत..
मी पण नाही....

पण एक गोष्ट मात्र
खरी आहे,
प्रेम माझे आजही
आहे तिच्यावर

नाकारत ..
ती पण नाही,
सांगत...
मी पण नाही.......



माय…

कळतच नव्हत मला,
माय माझी एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची ||

माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची |
काय पहात होती कुणास ठाऊक पण,
पदराखाली मला घट्ट धरून बसायची ||

पाऊस नव्हता तरी सुद्धा, माझ्या अंगावर थेंब पडायची |
मांडीवर मला थोपटतांना,
तिची का झोप उडायची ||

काहीच नव्हते घरात तरी,
ती घराला फार जपायची |
एकच होत लुगड तिला,
तेच ती धुवून रोज नेसायची ||

सणावाराच्या दिवशी मात्र,
माझ्यावर करडी नजर ठेवायची|
जावू नये कुणाच्या घरी म्हणून,
मला घरातच लाडीगोडी लावायची ||

रोजच सकाळी हात जोडून, देवाला काहीतरी मागायची |
गालावर हात फिरवून माझ्या,
बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची ||

मातीच्याच होत्या भिंती,
पांढर्या मातीनेच लिंपायाची |
अंगणात टाकायची सडा नि,
घर शेणाने सुंदर सारवायाची ||

सकाळीही रोजच मला,
घासून अंघोळ घालायची |
चुलीवरल्या भाकरीचा घास,
तिच्या हातानेच भरवायची ||

शाळेत मला धाडतांना, स्वप्ने मोठमोठी बघायची |
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा,
तरी माझ्याकडे पाहून हसायची||

कळतच नव्हत मला,
आई एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची।।

असच काहीतरी……

आमचा देव दगडाचा नाही.
आम्ही दगडात देव पाहणारी
माणसं आहोत.
दगडात देव असतोच, मुर्ती
असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा
असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन    द्यायच्या
भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर
गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी
शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला
शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला
नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद,
प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो
आचार, तो विचार हा टाकायचा भाग.
स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या
सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या
जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा
वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच
लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस
किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर
जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही,
किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय
काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात
येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही,
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही,
कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.
कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता
आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी
पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या
त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ
सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या
ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच
वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते.
आपण जमिनीवरच आहोत
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप
विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास
होतो.
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक
प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही
गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत
.आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण
.एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर
हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका
होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार
केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला
असेल.
आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या
बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की
उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं
आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष
असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की
आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट
करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना
पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी,
हा!
पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही
वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही
वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून
कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते
पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत
नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...
निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की
बुध्दीवर ?बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा
सोडवणार ?
               -व.पु.काळे…